आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना शिबीर:21 महाविद्यालयांतील 590 कॅडेटने घेतले ट्रील मॅप रिडिंग

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत 57 आणि 48 महाराष्ट्र बटालियनचा राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी औरंगाबाद यांच्या वतीने महाराष्ट्रातील धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यातील 21 महाविद्यालयातून 590 कॅडेटचे निवासी कॅडेटचा सहभाग आहे.

या शिबिरात ट्रील मॅप रिडिंग, ऑप्टीकल फायरिंग, फिल्ड क्राप्ट, वॅटल क्रॉप्ट, हेल्थ अॅण्ड हायजीन, योगा, कवायत, आदींचे प्रशिक्षण घेतले, अशी माहिती प्राचार्य डाॅ.प्रदीप दिघे यांनी दिली.

भरतीसाठी होतो उपयोग

या प्रशिक्षण शिबीरात दिल्ली येथे होणाऱ्या थल सेना संघ आणि प्रजाकसत्ताकसाठी कॅडेटच्या निवडी बरोबरच ट्रील मॅप रिडिंग, ऑप्टीकल फायरिंग, फिल्ड क्राप्ट, वॅटल क्रॉप्ट, हेल्थ अॅण्ड हायजीन, योगा, कवायत आदीचे स्थल सेनेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा आर्मीसाठी, पोलिस भरतीसाठी व सीआरएफच्या भरतीसाठी उपयोग होतो.

शिक्षणाविषयी समाधान व्यक्त

या दहा दिवसांच्या परिपूर्ण प्रशिक्षणातून व्यक्तीमत्त्व विकासाबरोबरच शारिरीक कवायतीच्या माध्यमातून शारिरीक तंदुरूस्ती स्थलसेनेसाठी उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास या प्रशिक्षणाचे प्रमुख कंमाडंट ऑफिसर कर्नल किशोर भागवत यांनी व्यक्त केला. येथील सुविधा याबद्दल आणि प्रशिक्षणाविषयी समाधान व्यक्त केले.

यांचे मोलाचे मार्गदर्शन

या शिबीरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एमसीसीचे प्रमुख कॅप्टन डाॅ. राजेंद्र पवार, कॅप्टन सुजाता देवरे, केअर टेकर ऑफिसर प्रा.दशरथ खेमनर यांनी सर्व आवश्यक त्या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन शिबीर यशस्विततेसाठी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.आर.जी.रसाळ, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. अनिल वाबळे, डॉ.शांताराम चौधरी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

कौतुकांचा वर्षाव

ग्रामीण भागातील मुलांना देशसेवेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने व उत्साहाने या खडतर प्रशिक्षणासाठी सहभागी झाल्याबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, खासदार डाॅ. सुजय विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ यांच्यासह सर्व संचालक व पदाधिकारी यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...