आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे‎ जनआक्रोश आंदोलन‎

पारनेर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी‎ उठवावी, कांद्याला हमीभाव मिळावा या‎ प्रमुख मांगण्यांसह इतर मागण्यांसाठी‎ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर -पुणे‎ महामार्गावर तब्बल एक तास जनआक्रोश‎ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.‎ दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भावना ऐकून‎ घेण्यासाठी तहसीलदार शिवकुमार‎ आवळकंठे उपस्थित नसल्याचे लक्षात‎ आल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार नीलेश‎ लंके जिल्हाधिकारी अथवा प्रांताधिकारी‎ आंदोलन स्थळी आल्याशिवाय आंदोलन‎ मागे घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केले.‎ महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी‎ उपस्थित नसल्याने आंदोलन तब्बल एक तास‎ लांबले.

यावेळी कांदा रस्त्यावर ओतून‎ सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार‎ लंकेे यांच्यासह अनेक आंदोलकांनी गळ्यात‎ कांद्याच्या माळा घातल्या होत्या. तहसीलदार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आवळकंठे यांच्यावर आंदोलकांनी तोंडसुख‎ घेतले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात‎ आल्या. दरम्यान, सुपे पोलिस ठाण्याच्या‎ पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पुन्हा‎ आमदार लंके यांना विनंती केल्यानंतर तब्बल‎ एक तासाने आंदोलन मागे घेण्यात आले.‎ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष‎ बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, दीपक‎ लंकेे, कारभारी पोटघन, राहुल झावरे, सतीश‎ भालेकर, विजय पवार आदी सहभागी होते.‎

बातम्या आणखी आहेत...