आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्ष:श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रसचे वर्चस्व

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छाया: अंकुश शिंदे - Divya Marathi
छाया: अंकुश शिंदे

तालुक्यातील १० ग्रामपंचायतीं निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ९ तर काँग्रेसला १ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळाले आहे. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाला भोपळाही न फोडता आला नाही. त्यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांचा चुलतभाऊ साजन पाचपुते यांनी स्वतःच्या गावातच पराभव केला. श्रीगोंदा तालुक्यात त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का बसला आहे.

तालुक्यात ग्रामपंचायत मतमोजणीत सरपंचपदी थिटे सांगवीत राष्ट्रवादीचे अर्जुन रामचंद्र शेळके हे ४५७ मते मिळवून ६८ मतांनी विजयी झाले. चवरसांगावीत येथे राष्ट्रवादीच्या सुनीता माळशिखरे अवघ्या ३ मतांनी विजयी झाल्या. तरडगव्हाणमध्ये कुंदा राजेंद्र बेरड ३३१ मते मिळवून ७ मतांनी विजयी झाल्या. घोगरगाव येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस गटाच्या सुजाता मिलिंद भोसले १३७३ मते मिळवून १०१ मतांनी विजयी झाल्या. तांदुळी दुमाला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मारुती निगडे १२०२ मते मिळवून १६१ मतांनी विजयी झाले. पारगाव सुद्रिक येथील सुरेखा दत्तात्रय हिरवे २१७० मिळवून १०४ मतांनी विजयी झाले. बेलवंडी बुद्रुक येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार सर्वात जास्त मतांनी (३३१३) आघाडी घेऊन विजयी झाले. माठ येथे अरुणा विश्वनाथ पवार ७२२ मते मिळवून ३९५ मतांनी निवडून आल्या. काष्टीत काँग्रेसचे साजन पाचपुते १६१ मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांनी भाजपचे आमदार पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांचा दारुण पराभव केला. बनपिंपरी ग्रामपंचायत आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप यांनी सरपंच व इतर सर्व सदस्यांसह यापूर्वीच बिनविरोध निवडली होती.

निगडे १२०२ मते मिळवून १६१ मतांनी विजयी झाले. पारगाव सुद्रिक येथील सुरेखा दत्तात्रय हिरवे २१७० मिळवून १०४ मतांनी विजयी झाले. बेलवंडी बुद्रुक येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार सर्वात जास्त मतांनी (३३१३) आघाडी घेऊन विजयी झाले. माठ येथे अरुणा विश्वनाथ पवार ७२२ मते मिळवून ३९५ मतांनी निवडून आल्या.

काष्टीत काँग्रेसचे साजन पाचपुते १६१ मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांनी भाजपचे आमदार पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांचा दारुण पराभव केला. बनपिंपरी ग्रामपंचायत आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप यांनी सरपंच व इतर सर्व सदस्यांसह यापूर्वीच बिनविरोध निवडली होती.

काष्टीत चुरस रंगली
भाजपचे आमदार पाचपुते यांच्या काष्टी गावात मुलगा प्रतापसिंह यांना ३८०८ मते, तर साजन पाचपुते यांना ३९९८ मते मिळाली. तिसरे उमेदवार अनिल कोकाटे यांना ९७३ मते मिळाली. या निवडणुकीत दाेन तुल्यबळ उमेदवारांनी अमाप पैसा खर्च केल्याची गावात चर्चा आहे. गुलाबी रंगाचा कागद हा कोडवर्डही गावात सध्या चर्चिला जात आहे. दोन चुलतभावांमध्येच रंगलेल्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. साजन पाचपुते यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. त्यात त्यांनी बाजी मारली आहे.

बातम्या आणखी आहेत...