आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:विद्यार्थ्यांनी तयार‎ केले नैसर्गिक रंग‎

नगर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाच विद्यालयांतील तीन हजार विद्यार्थ्यांनी‎ पाने, फुले, फळे यापासून नैसर्गिक रंग तयार केले.‎ निमित्त होते ''नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळेचे.‎ कार्यशाळेत फळे, फुले, पाने यांचा वापर करुन‎ हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी नैसर्गिक रंग‎ तयार करण्याच्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेत सात‎ प्रकारचे नैसर्गिक रंग तयार केले.

यात बीटपासून‎ जांभळा रंग, बेलफळापासून नारंगी, आवळ्यापासून‎ काळा रंग, गुलाब, जास्वंद व पळसाच्या फुलापासून‎ नारंगी आणि लाल रंग, पालक भाजी पासून हिरवा रंग,‎ हळदी पासून पिवळा रंग, निळेपासून निळा रंग व‎ कोळशापासून काळा रंग तयार करुन दाखवत घरच्या‎ घरी नैसर्गिक रंग तयार करण्याची कृती सांगितली. या‎ कार्यशाळेत नवनाथ विद्यालय निमगाव वाघा, श्री‎ छत्रपती विद्यालय बेलवंडी, नगरमधील प्रगत विद्यालय,‎ दादा चौधरी विद्यालय ,सिताराम सारडा विद्यालयातील‎ तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होत प्रशिक्षण घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...