आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरुवात:बुऱ्हाणनगरमध्ये पालखीच्या मानाच्या दांड्याची विधीवत पूजा

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहराजवळील असलेल्या बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात रविवारपासून नवरात्र उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. रविवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर तुळजाभवानी देवीच्या पालखीचा दांडा राहुरी येथे नवा पाळणा बनवण्यासाठी विधिवत पूजा करून रवाना करण्यात आला.

अहमदनगर येथील प्रसिद्ध बुऱ्हानगर येथील तुळजाभवानी मंदिरात 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा करण्यात होणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.अहमदनगरची कुलस्वामिनी असलेल्या बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात दरवर्षी नवरात्रात यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते.

पौराणिक दांड्याची विधिवत पूजा

रविवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर तुळजाभवानी देवीच्या पालखीचा दांडा राहुरी येथे नवा पाळणा बनवण्यासाठी विधिवत पूजा करून रवाना करण्यात आला. राहुरी येथे दरवर्षी नव्याने पालखी तयार केली जाते. बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत व दुर्गा भगत यांनी पालखीच्या पौराणिक दांड्याची विधिवत पुजा व आरती केली.

श्रीक्षेत्र तुळजापूर कडे रवाना

संबळ व वाजंत्री वाजवून जल्लोषात ही पालखी राहुरीकडे रवाना करण्यात आली. यावेळीअॅड.अभिषेक भगत म्हणाले, नवरात्री उत्सवा निमित्त तुळजाभवानी देवीच्या पालखी सोहळ्यास आजपासून सुरवात होत आहे. राहुरी मधील सुतार पालखीचा नवा पाळणा बनवून 10 सप्टेंबर पासून ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुक्यात 40 गावांना जाऊन नगरच्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी देवीच्या या मंदिरात येते. येथून ही पालखी श्रीक्षेत्र तुळजापूरकडे रवाना केली जाते.यावेळी देवीचे पुजारी किरण भगत, सुभाष भगत, हृषीकेश भगत व भगत परिवार उपस्थित होता.

पहिला मान तुळजापूरच्या पालखीचा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानीदेवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजारांहून अधिक वर्षांपासून बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबाच्या तुळजाभवानी देवी मंदिराकडे आहे. तुळजाभवानी देवीच्या सीमोल्लंघनासाठी नगरमधून दरवर्षी पालखी जात असते. याच पालखीतून देवी विजयादशमीला सीमोल्लंघन करत असते.

या पालखीला लागणारे सर्व साहित्यांसह सुमारे 200 वर्षे जुना असलेला पालखीचा ऐतिहासिक दांडा राहुरीच्या सूताराकडे पालखीचा पाळणा बनवण्यासाठी रविवारी रवाना झाला आहे. एक हजार वर्षापासून भगत कुटुंबीय ही परंपरा जपत आहे. असे देवस्थानचे अॅड.विजय भगत यांनी रविवारी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...