आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

41 व्या क्रमांकाचे शक्तिपीठ अंबिका मातेचा नवरात्रोत्सव थाटात होणार:कार्यकारी मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 51 शक्तीपीठांपैकी 41 व्या क्रमांकाचे शक्तिपीठ म्हणून पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील आदिशक्ती अंबिका माता देवस्थान जिल्ह्यात नव्हे तर राज्यात परिचित आहे. यंदा कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आदिशक्ती अंबिका मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात अन् थाटात करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळ व ग्रामस्थांनी बैठकीत घेतला.

नवरात्र उत्सव काळात लाखो भाविक अंबिका मातेच्या दर्शनासाठी येत असतात. राज्य नाट्य स्पर्धा आणि वेगवेगळ्या सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमामुळे येथील या नवरात्रोत्सव सोहळ्याचा राज्यभर नावलौकिक झाला आहे. या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून नवरात्र उत्सवाची बैठक शनिवारी झाली. अंबिका ट्रस्ट, ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ, दानशूर यांच्या सहकार्यातून नवरात्र सोहळा मोठ्या थाटामाटात होईल याची ग्वाही सर्व ग्रामस्थांनी दिली. या बैठकीत नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करून अध्यक्षपदी संदीप मुळे, उपाध्यक्षपदी जगन्नाथ मगर सचिवपदी बाबुराव बेलोटे आणि कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

या बैठकीला सरपंच विठ्ठलराव सरडे, उपसरपंच सुलोचना वाढवणे, ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष संपतराव वाळूंज सर्व विश्वस्त व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव बेलोटे, अशोकराव मुळे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य, जगदंबा पतसंस्थेचे सर्व सदस्य, श्रीराम पतसंस्थेचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्क साधण्याचे आवाहन

या नवरात्रोत्सव काळात होणारे कार्यक्रम नाटक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख यांनी नवरात्र उत्सव मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपतराव वाळुंज 9226162636, संदीप मुळे 9850961796, जगन्नाथ मगर, बाबुराव बेलोटे यांच्याशी साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांची मोठी उपस्थिती

नवरात्रोत्सवात नगर, पुणे, नाशिक आणि संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात गोसावी समाज बांधव आणि भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे नवरात्र उत्सवात राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे. त्या दृष्टीनेही विश्वस्त मंडळ नियोजन करत आहे.

बातम्या आणखी आहेत...