आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या, पुण्याहून नगरला येताना जातेगाव घाटात हल्ला

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात ही घटना घडली. गाडीला कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

जरे या सोमवारी रात्री पुण्याहून नगरकडे येत होत्या. गाडीत मुलगा, आई व नगर मधील त्यांची एक मैत्रीण असे चौघेजण होते. गंभीर जखमी अवस्थेत जरे यांना उपचारासाठी नगर येथे आणण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser