आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:राष्ट्रीय महामार्गावरून फक्त राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते फिरत नाहीत; आमदार नीलेश लंके यांचे पाथर्डीत प्रतिपादन

पाथर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी कुठल्याही राजकीय अपेक्षेने जिल्ह्यात फिरत नाही. जनसामान्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. राष्ट्रीय महामार्गावर फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फिरत नाहीत. तरी देखील काही लोकांना याचा पोटशुळ उठत असेल तर मी काही करू शकत नाही, अशी टीका विखे पिता-पुत्र यांचा नामोल्लेख टाळत आमदार निलेश लंके यांनी केली.

जिल्ह्यातील तीन महामार्गाच्या दुरुस्ती व पूर्ण कामासाठी आमदार लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण करून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेतले. यानंतर त्यांनी पारनेर मतदारसंघ अथवा निवासस्थानी न जाता पाथर्डीकडे धाव घेत रस्त्याची पाहणी केली. रस्त्याचे काम सुरू झाले असल्याची खात्री करत मोहटादेवी येथे दर्शन घेतले. तेथे आमदार लंके यांचे स्व. वसंतराव नाईक चौकात वाजत-गाजत स्वागत झाले. मुख्य बाजारपेठेतून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

नवी पेठ येथील सुवर्णयुग परिवार ट्रस्टच्या गणपती मंदिरात सत्काराच्या कार्यक्रमप्रसंगी आमदार लंके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिवारचे अध्यक्ष संतोष भागवत, बाळासाहेब जिरेसाळ, राजेंद्र शेवाळे, संजय दराडे, मोदक मानूरकर, सुनील मानुरकर, अतुल जोजारे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...