आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे-फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसचीच भीती:हाच पक्ष त्यांची सत्ता धोक्यात आणू शकतो,  मंथन शिबिरात जयंत पाटलांचा हल्लाबोल

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीसांवर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'राष्ट्रवादी मंथन... वेध भविष्याचा' या टॅगलाईनखाली हे शिबिर होत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिबिराचे प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिबिराचे प्रास्ताविक केले.

शरद पवार उद्या येतील

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 23 वर्षे झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील.

अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही

जयंत पाटील म्हणाले, राज्यात सत्ता नसताना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष केंद्रस्थानी आहे. पक्षाने हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत, अस्वस्थ आहे. सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवेदन दिले. मात्र, सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही, याबद्दल तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राष्ट्रावादीचे सर्व प्रमुख नेते शिबिराला उपस्थित आहेत.
राष्ट्रावादीचे सर्व प्रमुख नेते शिबिराला उपस्थित आहेत.

शिंदेंच्या बंडामागे फडणवीस

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते. मात्र, आता फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे आपल्या एका फोनवर गुवाहाटीला गेले, असे जाहीर केले. त्यामुळे शिंदेंच्या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली.

लोकांपर्यंत आपली कामे पोहोचवा

आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोचवा ती लोकांपर्यंत जायला हवीत, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या शिबिराला खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रादवादीचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी हजर आहेत.

बातम्या आणखी आहेत...