आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध, रविवारी राष्ट्रवादी कर्जत शहर यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

कर्जतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर तसेच हल्ल्याच्या सुत्रधारावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी रविवारी राष्ट्रवादी कर्जत शहर यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदन उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी स्वीकारले. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. तसेच भाजपाच्या नीच राजकारणाचा जाहीर निषेध म्हणत घोषणा देण्यात आल्या. या निवदेनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा विशाल मेहेत्रे, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष मनीषा सोनमाळी, नगराध्यक्षा उषा राऊत, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल भगत, विद्यार्थी काँग्रेसचे राम जहागीरदार, गटनेते संतोष म्हेत्रे, विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतिक ढेरे आदींच्या सह्या आहेत.