आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व सामान्याचा आधार:पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागलेल्या मुलाचा वाचवला जीव, ऊसतोड्याच्या स्वागताने भारवले रोहित पवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. आपल्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी कायम तत्पर असतात. आता पुन्हा रोहित पवार यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून त्यांचे सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. मेंदूला मार लागलेल्या ऊसतोड्याच्या मुलासाठी रोहित पवार धावून गेले आणि मुलाचा जीव वाचवला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली असून याचे काही फोटो शेअर केले आहेत. रोहित पवारांच्या या पोस्टला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं, की सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात माझ्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागला होता. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याकामी लक्ष घातल्याने त्याचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून मला घरी बोलावलं. घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला, या शब्दात रोहित पवार यांनी आनंद व्यक्त केला.

मदार रोहित पवार सोशल मीडियावर विविध कारणास्तव नेहमीच चर्चेत राहत असतात. आपल्या दैनिक कामकाजाची माहिती ते सोशल मीडियातून देतात. यापूर्वीही आमदार रोहित पवार आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या दुकानात, घरी गेले आहेत. कोणताही अभिनिवेश न दाखवता अगदी साधेपण ते जपत आहेत. त्यांच्या या साधेपणावर कार्यकर्तेही भाळत असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...