आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भिंगार नाला व परिसराची स्वच्छता करण्याची राष्ट्रवादीची मागणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भिंगार नाला परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे भिंगार नाला व परिसराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसे निवेदन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना देण्यात आले. भिंगार शहरातील नागरी समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांच्याशी चर्चा केली.

चर्चेदरम्यान अहमदनगर महानगरपालिकेचा छावणी परिषदेसोबत पाण्याबाबत कोणताही करार झाला नसल्याची माहिती मोरे यांनी दिली. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड हे महापालिका हद्दीत जाणार असल्याची चर्चा असून, यासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले, छावणी परिषद महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाला पत्र पाठवले आहे. केंद्र शासनाने ते पत्र राज्य सरकारला पाठवून अभिप्राय मागवला असता, राज्य सरकारने छावणी परिषदेला पत्र पाठवले असून, ते अद्याप छावणी परिषदेत असल्याचे मोरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विशाल बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमधील पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज लाईन, हातपंप, तसेच पंचशील नगर ते देशमुख मंगल कार्यालयपर्यंत रस्त्याबाबतचा प्रश्न मांडण्यात आला. भिंगारध्ये ठिकठिकाणी सायंकाळी अंधार पसरलेला असतो. त्यामुळे पथदिवे सुरु करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मा उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संपत बेरड, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष अकील शेख, संजय खताडे, शिवम भंडारी, सागर चवंडके, अजिंक्य भिंगारदिवे, समीर सय्यद, जनाभाऊ भिंगारदिवे आदी उपस्थित होते. येत्या १० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छावणी परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...