आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी:इमानदार कार्यकर्त्यांची दखल घेत नसतील तर राष्ट्रवादीचा पर्याय

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे इमाने इतबारे काम करूनही आम्हाला संधी दिली जात नाही. आगामी काळात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची दखल घेतली नाही, तर इतर पक्षात प्रवेश करण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करू, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गजें यांनी केले. राष्ट्रवादीच्या तोलामोलाच्या नेत्यांसमोरच गर्जे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टाकळीमानुर येथे बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्या निवासस्थानी अायाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख होते. प्रमुख पाहुणे आमदार निलेश लंके, शेवगावचे सभापती डॉ. क्षितिज घुले, झेडपी सदस्या हर्षदा काकडे, उज्वला शिरसाट, गोकुळ दौंड, डाॅ. बंडू भांडकर, तुकाराम पवार, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक चांद मणियार आदी उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, जनतेसाठी संघर्ष करणाऱ्याला जनता नेता बनवते. हे आपण विविध निवडणूकातून पाहत आहोत. जनतेला वैयक्तिक कामांपेक्षा सर्वांगीण विकास महत्त्वाचा वाटतो. नगर दक्षिणचे काही लोकप्रतिनिधी रस्त्यातील खड्ड्यात जनतेला घालून स्वतः हेलिकॉप्टरने फिरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...