आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सहकारी संस्थांमधील पदाधिकारी; संचालकांना प्रशिक्षणाची गरज

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सहकारी विकासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हयातील एक प्रमुख कामधेनू संस्था आहे. सहकारी संस्थामधील पदाधिकारी, संचालक, सेवक यांना सहकारी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले.

अहमदनगर भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सहकार प्रशिक्षक प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक जिल्हा सहकार विकास अधिकारी व सहकार शिक्षणाधिकारी यांचे करीता ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन वर्पे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे जनसंपर्क अधिकारी, भारत पाटील, एस. एस. बोडके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...