आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभुत सुविॆधा:रस्ते, पाणी, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी हवी ; समस्यांचा  अहवाल आयुक्तांकडे देणार

अहमदनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीतर्फे आयोजित ‘रुबरू’ कार्यक्रमात भिस्तबाग, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड, तपोवन रोड, मुकुंदनगर परिसरातील नागरिकांनी समस्या मांडल्या. उपनगर परिसरात स्मशानभूमी, अग्निशमन केंद्राची गरज व्यक्त केली. नागरिकांनी पाणी, रस्ते, अतिक्रमण, ओपन स्पेसचे सुशोभिकरण, स्वच्छता आदी मुद्द्यांकडे नगरसेवक व प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेवकांनीही आश्वासन देतानाच विविध मुद्दे मांडले. यावेळी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

मुकुंदनगर ५० टक्के भाग विकसित, इतर भाग दुर्लक्षित

मुकुंदनगरचा ५० टक्के भागच विकसीत झाला, पण उर्वरीत ५० टक्के भाग अविकसीत आहे. नागरी प्रश्नांवर वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच वेळोवेळी आंदोलने करून निवेदन दिले, पण प्रश्न सुटले नाहीत. {असिफ सुलतान, नगरसेवक

प्रभागांतील पाणीपुरवठा, अतिक्रमण आदी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू

रूबरू कार्यक्रम वॉर्डनिहाय सुरू करावेत. या माध्यमातून नागरिकांनी प्रश्न मांडले आहेत. पुढील वेळी मनपाचे सर्व अधिकारीही बोलवा. या प्रभागांतील पाणीपुरवठा, अतिक्रमण आदी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. {दिपाली बारस्कर, नगरसेविका, मनपा.

नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचा अहवाल आयुक्तांकडे देणार

नागरिकांनी मांडलेले प्रश्न प्रभाग समिती कार्यालयाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. तसेच काही प्रश्नांबाबत आयुक्तांना अहवाल सादर केला जाईल. नगरसेवकांशी समन्वय साधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. {जितेंद्र सारसर, प्रभाग अधिकारी, मनपा.

बसवलेले स्ट्रिट लाईट बंदच, रस्त्यांचाही प्रश्न प्रलंबित

शहरातील विविध भागात स्ट्रिट लाईट बसवले जात आहेत. परंतु, आमच्या भागातही स्ट्रिट लाईट बसवले. परंतु, ते अद्याप सुरू झालेले नाहीत. या भागातील रस्त्यांचाही प्रश्न प्रलंबित आहे. नगरसेवक व प्रशासनाने हा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावा. {कैलास दिघे, नागरीक

मुकुंदनगर भागात पाण्याचा मोठा प्रश्न ‘अच्छे दिन’ आलेच नाही

वॉर्ड नंबर दोन व तीन मध्ये नागरिकांनी कनेक्शन घेतले, पण त्यांना पाण्याची अडचण आहे. आमच्याकडे अच्छे दिन आलेच नाहीत. मुकुंदनगर भागात पाण्याचा मोठा प्रश्न असून सहा दिवसांनी पाणी येते. अवेळी पाणी येत असल्याचाही प्रश्न मांडला. {समिरा शेख, नागरीक

बातम्या आणखी आहेत...