आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज महिला अनेक क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने गाजवत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना, ती कोठेही कमी पडत नाही. हे करताना आज अनेक महिला जीवनाशी संघर्ष करताना दिसत आहेत. संत नामदेव महिला विकास मंडळाच्या वतीने नेहमीच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिलांच्या कला-गुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांबरोबरच मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे अनेक महिला सक्षम बनत असल्याचे प्रतिपादन मंडळाच्या अध्यक्षा प्रफुल्लता काकडे यांनी केले. संत नामदेव महिला विकास मंडळाच्या वतीने सावेडी येथील संत नामदेव मंदिरात समाजातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षा प्रफुल्लता काकडे, उपाध्यक्ष निर्मला लोळगे, सेक्रेटरी अंजली काकडे, खजिनदार जयश्री नेवासकर, सहसचिव राजश्री धोकटे, कार्याध्यक्षा सुवर्णा भस्मे, ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिला दुमाटे, हेमलता वडे, प्रमिला बोधे, प्रतीभा काकडे, मंजूश्री सातपुते, पूजा काकडे, स्वाती अवसरकर, सुजाता नेवासकर, गीता दुमाटे, कल्पना हेंद्रे, गीता काकडे, सुनंदा गोंदकर आदी उपस्थित होते.
ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिला दुमाटे म्हणाल्या, “महिला एकत्र आल्यावर काहीही अशक्य नाही. महिलांनीच महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेतला, तर एक चांगला समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. संत नामदेव महाराज ट्रस्टच्या माध्यमातून महिलांच्या उन्नत्ती व प्रगतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचा अनेक महिलांना लाभ होत आहे.” प्रास्तविक जयश्री नेवासकर यांनी केले, तर आभार कल्पना हेंद्रे यांनी मानले. या वेळी वंदना पतंगे, संगीता बाचल, पुष्पा कल्याणकर, पुष्पा उरणकर, मनीषा पतंगे, विद्या हेंद्रे, वंदना काकडे, लक्ष्मी पाटकुले, कोमल चौकटे, शुभांगी कटारे, गीता बाचल, शिवकन्या कल्याणकर, रुपाली काकडे, डॉ. गौरी गाणबोटे, निर्मला बोंडगे, माधुरी बकरे, अर्चना पाटसकर, क्रांती पवार, शैला काकडे, उषा वडे उपस्थित होते.
मुलींच्या नावे ठेव पावतीचे वितरण
महिलांसाठी मेणबत्ती स्पर्धा, क्वॉईन स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्याचप्रमाणे दररोज हरिपाठ करणाऱ्या अलका दत्तात्रय वनारसे यांचा सन्मान करण्यात आला.‘मुलगी वाचवा, मुलगी जगवा’ उपक्रमांतर्गत मुलींच्या नावे ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रिया बाचल यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.