आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:एकमेकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात जर कोणी अडचणीत असेल, किंवा एखाद्याला मदतीचे गरज असेल, तर आपण त्यासाठी एकत्र येऊन मदत केली पाहिजे, हीच आपली संस्कृती असून ती जपण्याची गरज आहे, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक शंकर शेवाळे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी संत रोहिदास यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवाळे यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी चर्मकास संघटनेचे बाळाकिसन वाघ, रमेश कांबळे, किसन वाघ, विजय वाघ, प्रवीण कांबळे, गणेश देव्हारे, संतोष कदम, शुभम कांबळे, संदीप कदम, पोपट कदम, गणेश देव्हारे, गोरख कांबळे आदी उपस्थित होते. शेवाळे म्हणाले, आपण सामाजिक कार्यक्रमात एकत्र येऊन विचारांचे आदान प्रदान करतो.

बातम्या आणखी आहेत...