आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडे स्थानिक इतिहास लेखनाला महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण जगाच्या पटलावर गावाचा स्थानिक इतिहास लिहिला जावा, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. इतिहास लिहिताना गावाचे तेच का नाव पडले, गावाची भौगोलिक सीमा, चतु:सिमा, भौगोलिक स्थाननिश्चिती, नदी-नाले, त्यांची लांबी रुंदी, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक स्त्री, स्त्रियांचे शिक्षण, सामाजिक स्थिती आदी घटकांच्या नोंदणी घेतल्या पाहिजे. त्यातून मोठा दस्ताऐवज निर्माण होईल व तो अभ्यासक, भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे मत इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. किसन अंबाडे यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर कॉलेज विद्यार्थी विकास मंडळाअंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने एकदिवशीय कार्यशाळेत डॉ. अंबाडे बोलत होते.
इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. विजय कदम व प्रा. डॉ. कृष्णा पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, इतिहास विभागाचे प्रा. डॉ. सचिन मोरे, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे अमोल बुचडे, प्रा. श्रीराम मरकड आदी उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर म्हणाले, “गतकालीन घटनांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो, त्याला इतिहास म्हणतात. गतकालीन घटकांचा अभ्यास करताना, तो अभ्यास पूर्वग्रहावर आधारित नसावा, कारण पूर्वग्रहावर आधारीत संशोधन खरे असेलच, असे नाही. त्यामुळे गतकालीन घटनांचा शोध घेताना किंवा संशोधन करताना हा पूर्वग्रह दूर करून तथ्यांवर आधारित संशोधन करावे.” पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय कदम होते.
ते म्हणाले, की शेतमालाच्या किंमतीचाही इतिहास लिहिला गेला पाहिजे. या महापुरुषांच्या जयंती साजरा केल्या जातात. त्या प्रतिकात्मक न करता वैचारिक पद्धतीने झाल्या पाहिजेत. तसेच इतिहासाचे अलीकडे जे विकृतीकरण होत आहे, ते थांबले पाहिजे. दुसऱ्या सत्रात पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्रा.डॉ. कृष्णा पाटील यांनी इतिहास लेखनाचे पद्धतीशास्त्र या विषयावर विवेचन केले. तिसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रा. डॉ. सचिन मोरे होते. इतिहास लेखन सत्य परिस्थितीवर आधारित असावे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.