आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर-वांबोरी रस्त्यावर पिंपळगाव माळवी तलावाच्या ब्रिटिशकालीन सांडवा मोडकळीस आला आहे. तलाव कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे. ओव्हरफ्लोचे पाणी या सांडव्यावरील पाणी पातळी एक फुटापर्यंत पोहोचते. मागील वर्षी या सांडव्यावर अनेक अपघात झाले होते. पावसाचा जोर वाढल्यास चार चाकी वाहून जाण्याचाही धोका आहे. तथापि, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपळगाव माळवी तलावाच्या ओव्हरफ्लोचे पाणी नगर-वांबोरी या प्रमुख जिल्हा मार्गावरून वाहते. हा सांडवा १०२० मध्ये बांधण्यात आला होता. २०२० मध्ये या सांडव्याला १०० पूर्ण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी सांडव्याखालून काढण्यासाठी सांडवा खोदून सिमेंट पाईप टाकले होते. निकृष्ट दर्जाची जुजबी मलमपट्टी केल्यामुळे सांडव्यावरील दगड अधिकच खिळखिळे झाले आहेत. त्यावर अद्याप कोणतीही दुरूस्ती केली नाही, सांडव्याचा मध्यभाग खोलगट झाल्यामुळे थोड्या पावसातही संपूर्ण सांडव्यावर पाणी साचते. तलाव अद्याप ओव्हरफ्लो झाला नाही, परंतु, पुढील काही दिवसातच तलावर ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापनाने पावसाळापूर्व नियोजनात सांडव्याची दुरूस्ती करणे आवश्यक होते. परंतु, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन या सांडव्यावरून प्रवास करावा लागतो.
आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल
या रस्त्यावर मोठी वर्दळ असताना या धोकादायक सांडव्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या सांडव्याची तातडीने दुरूस्त करून पुढील कालावधी एक स्वतंत्र पुल उभारणीची गरज आहे. जर तातडीने या ठिकाणी उपाय योजना केल्या नाही, तर आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.'' रघुनाथ झिने,
माजी सभापती, जिल्हा परिषद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.