आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा महिला ही काटक, संयमी. समंजस, प्रयत्नांची पराकाष्ठा करारी असते. तिच्या अंगी जिद्द, चिकाटी व प्रबळ आत्मविेशास असतो. अशा अगाध शक्तीरूपी महिलेस जर संधी दिली तर तिला कला कौशल्य व चिकाटीला सहाय्य केले तर ती अनेक क्षेत्रात सक्रिय होईल. पर्यायाने देशाच्या विकासात वाढ होईल. सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात झाला. परंतु समाजातील अनेक घटकांतील महिला दुर्लक्षित आहेत. अशा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महिलांनाचे करावयाचे आहे. त्यांना आधार देऊन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
आज आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनने अशाच दुर्लक्षित महिलांचा सन्मान करुन समाजहित जोपासण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन डॉ.मार्सिया वॉर्न यांनी केले. आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्यावतीने धुणं-भांडी करणाऱ्या विधवा महिलांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ. वॉर्न, डॉ. शबनम शेख, नगरसेविका रुपाली पारगे, शोभा खंडागळे, फाउंडेशनच्या अध्यक्ष निर्मला केदारी, सचिव संगिता साळवी, उपाध्यक्ष मनिषा शिंदे, शिवाजी जाधव, वैशाली पार्ले, पुष्पा जाधव, प्रियेश वाघमारे, ऐश्वर्या कदम, स्वप्ना वाघमारे, वृंदा वैरागर, शुभांगी काळे, कोर मेंबर प्रिती वाघमारे, मार्कस् तोरणे, वंदना पवार, स्मिता भोसले, रेव्ह.सतीश तोरणे आदि उपस्थित होते.
यावेळी समाजसेविकांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. निर्मला केदारी म्हणाल्या, महिला शिक्षित झाल्या, आपल्या कर्तृत्वाने प्रगती करत आहेत. विविध क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवित आहेत. अशा महिलांचे संघटन करुन आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. महिला दिनी धुणी-भांडी करुन कुटूंबाला आर्थिक आधार देण्याबरोबरच मुलांचे शिक्षण करत आहेत. अशा महिलांचा सन्मान करुन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा संघटनेने प्रयत्न केला आहे. सूत्रसंचालन संगिता साळवी यांनी, तर आभार मनिषा शिंदे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.