आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय कर्तव्य करत असतांना बाईक चालकाने पल्सर जोराने धक्का दिल्याने डांबरी रोडवर खाली पाडुन रेसर बाईक भरधाव वेगाने पळवून नेवासाचे पोलिस निरीक्षक विजय करे हे जखमी झाले. ही घटना शनिवारी रोजी दुपारी ज्ञानेश्वर कॉलेजच्या गेटजवळ घडली. पोलिस शिपाई दिलीप कुऱ्हाडे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्याकडे पोलिस निरीक्षक विजय करे यांना घेवून येत असताना ज्ञानेश्वर कॉलेजसमोर रस्त्यावर रेसर बाईकवर दोघे बसून होते. मागील महिन्यात ज्ञानेश्वर कॉलेज त्यांच्याकडे विचारपुस केली असता काहीही न सांगता त्याने वेगाने निरीक्षकांना जोराने धक्का देत नेवासा खुर्द गावाच्या दिशेने पळून गेले. पोलिस निरीक्षक करे हे डांबरी रस्त्यावर पडून जखमी झाले. गाडी चालवणारा अरमान जावेद बागवान रा. नेवासा बु व त्याच्या पाठीमागे बसलेला इसम अरबाज रियाज सय्यद रा. नेवासा खु होते. पोलिस निरीक्षक करे यांना औषधोपचार करीता ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे उपचारांसाठी नेण्यात आले. या फिर्यादीवरुन अरमान जावेद बागवान व अरबाज रियाज सय्यद यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.