आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास सोय..:नेवासे तालुक्यातील भाविकांना मिळणार मोफत VIP शनिदर्शन, शिंगणापूर देवस्थान आणि प्रहारच्या संयुक्त बैठकीतील निर्णय

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यातील स्थानिक भाविकांना शनी चौथऱ्यावरील मोफत व्हीआयपी दर्शन देण्यात येईल, असा निर्णय शनिशिंगणापूर देवस्थान व प्रहारच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिली.

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टकडून शनिचौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाचशे रुपये शुल्काच्या विषयावर देवस्थान ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांची रविवारी संयुक्त बैठक झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, प्रहार कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे, शनिशिंगणापूर देवस्थान समितीचे अध्यक्ष भागवत बनकर, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, उपव्यवस्थापक अनिल दरंदले बैठकीस उपस्थित होते.

यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांनी परिसरातील स्थानिक नागरिकांना शनिचौथऱ्यावर मोफत दर्शन देण्याची मागणी केली. शनी महाराजांच्या मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी व मूर्तीला स्पर्श न करता भाविकांना तेल अर्पण करण्यासाठी एक तेल कुंडाची निर्मिती करून पाइपद्वारे शनिदेवाच्या मूर्तीवर तेल जाण्याची व्यवस्था करावी या आणि इतर सूचना केल्या. यावर शनी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी सांगितले की, परिसरातील स्थानिक भाविकांना मोफत दर्शन देऊ व स्थानिक असल्याचा पुरवा म्हणून आधार कार्ड गृहीत धरून व्हीआयपी दर्शन उपलब्ध करून देऊ. चौथरा वाढवणे, दर्शन रांगेचे बांधकाम व इतर कामे प्रगतीपथावर असून दोन महिन्यात ते पूर्ण करून भाविकांना सुखद दर्शन देण्याची व्यवस्था आम्ही तत्काळ करणार असल्याचे अध्यक्षांनी व उपस्थित देवस्थान कमिटीतील सदस्यांनी सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेले आंदोलन होण्याआधीच आमदार शंकरराव गडाख यांनी घडवून आणलेल्या समन्वय बैठकीमध्ये चांगले निर्णय झाले असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार शंकरराव गडाख व शनी देवस्थान ट्रस्ट कमिटीचे आभार मानले.