आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:नेवासे तालुका जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गुरूवारी (३ नोव्हेंबर) निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी नेवासे तालुक्यातील रामेश्वर चोपडे यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी शेवगाव, जामखेड तालुक्यातील उेदवारांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अंतिम निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेतल्यानंतर दुपारी या निवडी होतील. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरूमाऊली मंडळाच्या तांबे गटाने वर्चस्व स्थापन केले आहे.

मागील सत्ताकाळात तांबे यांच्या गटातून नेवासे व शेवगावला संधी मिळाली नव्हती. त्यातच नेवासे येथील चुरशीच्या लढतीत, विजयी ठरलेले चोपडे यांना संधी देता येईल का? यावर खासगीत मंथन सुरू आहे. तर शेवगाव तालुक्यातील रमेश गोरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील संतोष राऊत यांचे नावही खासगीत घेतले जात आहे. परंतु, आता कोअर कमिटी उपाध्यक्षपदासाठी महिलेला संधी देणार ? की, पुढील टप्प्यात उर्वरीत इच्छुकांचा विचार केला जाईल ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गुरूमाऊली मंडळाचे नेते बापू तांबे यांनी या निवडीबाबत कोअर कमिटीकडे बोट दाखवले आहे. अद्याप कोणतेही नाव निश्चित नसल्याचे स्पष्ट करून अंतिम निर्णय निवडीपूर्वी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, असे सांगितले. पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना तांबे गटासमोर नाराजी टाळण्याचेही आव्हान आहे.

नऊ महिन्यांचे ठरले सूत्र
पाच वर्षाच्या सत्ताकाळात साठ महिने काम करण्यासाठी मिळतात. त्यामुळे सात तालुक्यांना अध्यक्षपद तर सात तालुक्यांना उपाध्यक्षपद देता येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे पडद्यामागे झालेल्या चर्चेनुसार ९ महिन्याचे सूत्र ठरल्याची चर्चा आहे.

नाराजी बीजे रोवण्याची धास्ती
सत्ता आल्यानंतर प्रथमच अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडी होत असताना प्रथम संधी कोणाला द्यायची, इतर सहकारी नाराज होतील का? अशा अनेक प्रश्नांमुळे नाराजीची बिजे रोवली जाऊ नयेत, अशी धास्ती व्यक्त आहे.

बातम्या आणखी आहेत...