आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे तालुका वकील संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. कैलास रघुनाथ कापसे यांची, तर उपाध्यक्षपदी अॅड. भरत रामराव जाधव यांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल संलग्न नेवासे तालुका वकील संघाच्या एकूण १८९ पैकी १७३ मतदारांनी (९१.५३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अॅड. सोमनाथ दगडु गांगले, अॅड. कैलास रघुनाथ कापसे, अॅड. सुदाम सुखदेव ठुबे यांच्यात लढत झाली, तर उपाध्यक्षपदासाठी अॅड. साईनाथ गोपीनाथ हुळहुळे व अॅड. भरत रामराव जाधव यांच्या थेट सामना होता.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. कैलास कापसे यांना १००, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. सोमनाथ गांगले यांना २५ व अॅड. सुदाम ठुबे यांना ४८ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी अॅड. भरत रामराव जाधव यांना १०९ मते, तर अॅड. साईनाथ हुळहुळे यांना ६४ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अजय रिंधे व अॅड. ज्ञानदेव जाधव यांनी काम पाहिले.
बिनविरोध विजयी उमेदवार- अॅड. उत्कर्षा मच्छिंद्र मोटे (महिला उपाध्यक्ष), अॅड. जावेद बशीर इनामदार (सचिव), अॅड. राजेंद्र बहिरनाथ पंडीत (सहसचिव), अॅड. नितीन बाबासाहेब मते (खजिनदार). विश्वस्त- अॅड. राजेंद्र भीमराज बोरूडे, अॅड. सचिन माणिक घोडेचोर, अॅड. अभिजित ललित काळे, अॅड. बाळासाहेब जिजाबापू चव्हाण, अॅड. प्रसाद दिनकर गर्जे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.