आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा.राम शिंदे भाजपच्या बारामती प्रभारीपदी:आमदार रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजपकडून नवी रणनीती; शिंदे शुक्रवारी बारामतीत घेणार बैठक

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतरेचे वारे वाहत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या व कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले रोहित पवार यांच्या बारामती भाजप प्रभारी म्हणून विधानपरिषदेवर नुकतेच निवडून आलेले प्रा.राम शिंदे यांची नियुक्ती झाली आहे .येत्या दोन दिवसात शिंदे बारामती मध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडून रोहित पवार व भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. अटीतटीच्या लढतीत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दोन दिवसापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप कडून माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलून ही उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे विजयी झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून आमदार राम शिंदे यांची बारामती भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. बारामतीतून रोहित पवार अर्थात पवार कुटुंबियांना शह देण्यासाठी शिंदे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी शिंदे बारामतीत जाऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.