आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सहकारी पतसंस्थांची मातृसंस्था अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची नविन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी गुरुवारी (२२ डिसेंबर) दुपारी आयोजित विशेष सभेत करण्यात येणार आहेत. अगस्ति साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालीच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होईल. अगस्ति साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोक देशमुख यांची अध्यक्षपदी व मारूती भिंगारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडीवर एकमत होणे अपेक्षित आहेत. सन २०२२ ते २०२७ कालावधीसाठी १३ संचालकांसाठी सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली निवडणूक शांततेत व बिनविरोध पार पडली.
गुरुवारी (२२ डिसेंबर) दुपारी १२.१५ वाजता संस्थेच्या नविन संचालकांसमवेत अकोल्याचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) तथा अध्यासी अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षेखाली महात्मा फुले चौकातील अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची बैठक ठेवली आहे.
या बैठकीत नवनिर्वाचित संचालक मंडळातील संचालकांचे मतप्रवाह लक्षात घेऊन अगस्ति पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांचा आर्थिक विश्वास संपादन करून संस्थेचे काम सक्षम व विस्तारित करतानाच कर्जदारांवर वेळेवर कर्जहप्ते भरण्याबाबत अंकुश ठेवणारे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.