आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद:विसर्जन मिरवणुकीत स्वयंसेवी संस्थांनी जपले सामाजिक भान

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाला निरोप देण्यासाठी आयोजित मुख्य विसर्जन मिरवणुकीत स्वयंसेवी संस्था, युवा मंडळांनी सामाजिक भान जपत भक्तांची सेवा केली. सर्जेपुरा रामवाडी परिसरातील सिद्धीविनायक मित्र मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे, काझीम शेख, इमरान शेख, अमोल जोगदंड, रोहित भागवत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

गणेश विसर्जन मिरवणुकीत तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कापड बाजार येथील आदर्श व्यापारी तरुण मंडळाने फूड पॅकेटचे वाटप केले. पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांना सुमारे १ हजार फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. यामध्ये ड्रायफूट, लाडू, पाण्याची बाटली, पुरीभाजी, शेंगदाणा चटणी, आदींसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश केलेला होता. या अन्नदानासाठी सुवालाल बोथरा परिवाराचे योगदान लाभले.शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून पायघड्या घालण्याचे काम रंगसंस्कृतीचे सभासदांनी केले. सुमारे ५ हजार किलो रांगोळी व रंग वापरून रांगोळी काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...