आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र निमज ते श्रीक्षेत्र पैठण पायीदिंडी सोहळ्याचे पिंपरणे गावात आगमन झाले असता, गावात दिंडीचे आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. माऊलीच्या नामाने व भजने करीत गावातील भाविकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. निवृत्ती महाराज मतकर व रामनाथ महाराज शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र निमज येथून पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. दिंडीबरोबर आरोग्यसेवा, भोजन व्यवस्था, पाणी या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिशय शिस्तबध्द मार्गस्थ झाली.
पिंपरणे येथे सायंकाळी दिंडीचे आगमन झाले. दिंडीचे स्वागत गावातील उत्तम राहिंज, पत्रकार सुभाष भालेराव, संतोष देशमुख, पो.पा. विनोद साळवे, संतोष वाकचौरे, गोकुळ काळे, सुरेश गाडेकर, भाऊराव आ. ठोंबरे, सुधाकर कर्पे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. होळी सणानिमित्त दिंडीला पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. त्यासाठी काकासाहेब गायकवाड, उपसरपंच अजित देशमुख, संतोष वाकचौरे, संजय बागुल, कल्याण जोर्वेकर, मंजाबापू साळवे, पोलिस पाटील विनोद साळवे, भागवत ठोंबरे, दीपक अभंग, गोकुळ काळे, उत्तम राहिंज, पत्रकार सुभाष भालेराव, भाऊराव आ. ठोंबरे या ग्रूपच्या वतीने देण्यात आले. गेल्या ७ वर्षांपासून हा ग्रूप ही सेवा अखंडीतपणे करीत आहेत. किशोर जोर्वेकर, राजेंद्र देशमुख, रवींद्र ठोंबरे, सुभाष कर्पे, विलास काळे, राजेंद्र काळे, सुनील दिवेकर यांनी वारकऱ्यांच्या सेवेत मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.