आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांस:नऊशे किलो गोमांस जप्त; जनावरे डांबून ठेवून विक्री

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१ लाख ८१ हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले. ही कारवाई संगमनेर येथे करण्यात आली. खाटीक गल्ली ता. संगमनेर येथे गोवंश जातीची जिवंत जनावरे डांबून ठेवून विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली होती.

त्यानुसार निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनकर मुंडे, पोसई संदीप ढाकणे, विठ्ठल पवार, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना शंकर चौधरी, सचिन आडबल, विशाल दळवी, भिमराज खर्से, राहुल सोळुंके, रणजीत जाधव,बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सगीर बुढान कुरेशी (वय ४०, खाटीक गल्ली, ता. संगमनेर), मुशफिक मजरुल शेख, (वय ५०, रा. भारतनगर, ता. संगमनेर), मतीन बशीर कुरेशी, (वय ३५), फयीम खालीद कुरेशी, (वय ३५, दोन्ही रा. मुगलपुरा, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...