आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पानोडी येथे बोगस डॉ. असिम दास हा मंजुमाता दवाखाना चालवत होता, त्याच्यावर कारवाई आदेश तालुका आरोग्य अधिकारी यानी ७ मार्च २०२२ रोजी आश्वी खुर्द येथिल प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी कोडांजी मदने यांना दिले होते. कारवाईच्या भितीने पळून गेलेल्या बोगस डॉ. असिम दास यांच्यावर आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
डॉ. असिम दास हा मजुंमाता नावाने दवाखाना चालवत होता. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप याना मिळाल्यानतंर त्यांनी आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने याना याबाबत कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे डॉ. कोडांजी मदने हे पानोडी उपकेद्रांचे समुदाय आरोग्य अधिकारी अमोल उगलमुगले यांच्या समवेत पानोडी येथे दवाखाना असलेल्या ठिकाणी गेले होते. परंतु डॉ. दास याने पलायन केले होते. यावेळी डॉ. मदने याना हा दवाखाना एका खाजगी घरात असून त्यावर एक फलक लावलेला दिसला. त्या फलकावर मंजुमाता दवाखाना डॉ. असिम दास (निसर्गोपचार) तसेच विविध आजारी नावे लिहिलेली होती.
याबाबत डॉ. मदने यानी मेडिकल कौसिलकडे चौकशी केली असता या व्यक्तीच्या नावे पदवी आढळली नाही. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३६ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांना दास हा नगर येथील पारेगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे फौजदार शिवाजी पवार, पोलिस नाईक हुसेन शेख यांनी असिम चित्ररंजन दास याच्या मुसक्या आवळल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.