आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायर फायटर यंत्रणा:सिव्हिलच्या आगीनंतर नऊ महिने उलटूनही फायर फायटर यंत्रणेचे काम धिम्या गतीनेच

बंडू पवार | नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर तातडीने जिल्हा नियोजनामधून जिल्हा रुग्णालयात २ कोटी ४० लाखांचा निधी फायर फायटर (अग्निशामक यंत्रणा) बसवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले. मात्र घटनेनंतर नऊ महिने उलटून गेले तरी ही यंत्रणा बसवण्याचे काम धिम्या गतीनेच सुरू आहे. मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र चार महिने उलटून गेले तरीही काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

ऐन दिवाळीच्या कालावधीत कोरोनासाठी रुग्णांसाठी असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती.६ नोव्हेंबर २०२१ ला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचारा दरम्यान तीन जणांचा असे १४ जणांचे बळी गेले होते. आगीच्या प्रकरणानंतर तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजनाची बैठक घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात फायर फायटर यंत्रणा बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात फायर फायटर यंत्रणा बसवण्याचे काम ही सुरू करण्यात आले होते. मार्च महिन्यापर्यंत फायर फायटर यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र चार महिने उलटून गेले तरी देखील हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

फायर फायटर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात
मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र जिल्हा रुग्णालयात दैनंदिन रुग्ण व अन्य काही अडचणीमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही.३१ में पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज होता. आता ९० टक्के बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे केवळ प्रात्यक्षिक करणे बाकी आहे.महिन्याभरात जळालेला अतिदक्षता कक्ष पुन्हा सुरू होणार आहे.' डॉ.संजय घोगरे, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर.

अहवाल गुलदस्त्याच, आगीचे कारण अस्पष्टच
आगीच्या घटनेची दखल घेऊन तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. चौकशी समिती सदस्यांनी या प्रकरणा संबंधित बैठक घेतली व घटनास्थळाची पाहणीही केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा चौकशी अहवाल मंत्रालय स्तरावर पाठवला होता. मात्र आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

बातम्या आणखी आहेत...