आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यात भूकंपाची नोंद नाही:जिल्हा प्रशासनाचा दावा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - निवासी उपजिल्हाधिकारी

अहमदनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 22 नोव्हेंबरला रात्री 9 ते 9.30 वाजे दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत नाशिक येथे मेरी भूकंपमापन केंद्राच्या अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी बुधवार (23 नोव्हेंबर)ला केले आहे.

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री घरांना हादरे बसणारा आवाज आला होता. त्यामुळे नागरिकांत भूकंपाच्या शक्यतेची भीती निर्माण झाली होती. याबाबत अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती जाणून घेण्यासाठी येत होते. तसेच प्रशासनाची दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घेत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने नाशिक येथील मेरी भूकंपमापन केंद्राशी संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले. असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घेणे. भूकंप का होतो त्याची कारणे व होणा-या परीणामांबाबत चर्चा करा. घराची नियमित पहाणी करुन दुरुस्ती करणे जरुरीचे आहे, भिंतींना तडे गेले असतील तर ते बुजविणे व भिंतींची मजबुती करणे आवश्यक आहे.

लोडबेअरींग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोप-यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह कॉक्रीट वापरणे व त्याची प्लींथ, लिंटल व रुफ बँडमध्ये सांधणी करणे आवश्यक आहे. अशी काळजी भूकंप पूर्वी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...