आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा:जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाची नोंद नाही

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मंगळवारी रात्री ९ ते ९.३० वाजे दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत नाशिक येथे मेरी भूकंपमापन केंद्राच्या अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री घरांना हादरे बसणारा आवाज आला होता. त्यामुळे नागरिकांत भूकंपाच्या शक्यतेची भीती निर्माण झाली होती. याबाबत अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती जाणून घेण्यासाठी येत होते. तसेच प्रशासनाची दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घेत होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने नाशिक येथील मेरी भूकंपमापन केंद्राशी संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले, असे पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...