आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिकुल परिस्थि:कितीही प्रतिकुल परिस्थिती आली तरी भगवंताची भक्ती सोडू नये

कोपरगाव शहर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गंगागिरीजी महाराज यांच्या सह ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराज आदींसह पाच महंत होऊन गेले. सद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही ही जबाबदारी पेलत आहोत. आपले कर्म चांगले असेल तर भगवंताची कृपा निश्चितच आपल्या वर राहील. कितीही प्रतिकुल परिस्थिती आली तरी भगवंताची भक्ती, भजन सोडू नये, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

कोकमठाण येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज १७५ व्या हरिनाम सप्ताहाचे लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. २ ते ९ ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते दीप प्रज्वलित करून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कोकमठाण येथे हनुमान मंदिरात पूजन करण्यात आले. पुणतांबा फाटा ते सप्ताह स्थळापर्यंत महंत रामगिरी महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. भजन मंडपात पोहचताच महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करण्यात आला. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराजांसह सर्व संताच्या प्रतिमांचे पूजन करुन तसेच विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.

याप्रसंगी महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, निष्काम भक्ती करावी, सदगुरू गंगागिरीजी महाराज हे निष्काम कर्मयोगी व अलौकिक संत होते. अखंड हरिनाम हा तपस्या यज्ञच आहे. गंगागिरीजी महाराज हे निष्काम सन्याशी होते, त्यांच्या परंपरेतील हे कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेत आहोत, अहोरात्र अखंड भजन पाहिल्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी अवतरल्या शिवाय रहाणार नाही. भक्ती करताना ती नि:स्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना याप्रसंगी रामगिरी महाराजांनी केली.

यावेळीसंत रमेशगिरी महाराज, आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष सुधारक रोहम, कार्याध्यक्ष संभाजी रक्ताटे, सचिव शरद थोरात,राजेश परजणे ,वसंत लोंढे,रंगनाथ लोंढे,नंदकिशोर पवार,सुभाष जाधव,बाळासाहेब जाधव, शिवाजी ठाकरे, कमलाकर कोते,बाळासाहेब कापसे,कडूभाऊ काळे ,जंगली महाराज आश्रमातील संत गण, भाऊलाल सोमासे आदी उपस्थित होते.

दीड लाख भाविकांनी प्रसाद घेतला
आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून श्री सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी खान्देश मधील प्रसिद्ध पुरणपोळी, जेवणासाठी मालेगाव ,येवला, नांदगाव, कोपरगाव ,वैजापूर,राहाता आदी तालुक्यातील भाविकांनी मांडे दिले, तर गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी यासाठी ३८ हजार दूध पिशव्या दिल्या. पंचक्रोशीतुन दोन लाख भाविकांनी हजेरी लावली तर दीड लाख भाविकांनी प्रसाद घेतला.''
संभाजी रक्ताटे, कार्याध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...