आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:थकबाकी भरल्यानंतरच मिळणार ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलवंडी ग्रामपंचायतची निवडणूक येत्या १८ डिसेंबरला होत असल्याने निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपर्यंत असल्याने इच्छुक उमेदवारांनी थकबाकी भरण्यास धावपळ सुरू केली आहे. परंतु ग्रामपंचायतीची थकबाकी भरल्याशिवाय ना हरकत दाखला मिळत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. तर थकबाकी भरताच दाखले देऊ असे ग्रामसेवकांचे सांगणे आहे. थकबाकी नसल्याचा दाखला देण्यासाठी निवडणूक आयोगाने रेशनकार्डमध्ये असणाऱ्या कुटुंबाच्या नावे असणाऱ्या मिळकतीची थकबाकी नसली पाहिजे, असा आदेश आहे.

मात्र ग्रामसेवक रेशनकार्ड विभक्त असूनही थकबाकी नसल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडवणूक करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे. आपले रेशनकार्ड अनेक वर्षांपासून विभक्त असून आपण विभक्त राहत आहे. तरी ग्रामसेवक थकबाकी नसल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. एक प्रकारे अडवणूक करीत आहेत, असे नामदेव घोडेकर म्हणाले. तर ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी बी. बी. रासकर यांना विचारणा केली असता रेशनकार्डवरील सदस्यांच्या नावे असणारीच थकबाकी उमेदवारांनी भरावयाची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...