आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:गरिबीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये ; शैक्षणिक : तपोवन रोड येथील गुरुकुल कॅम्पस येथे नामकरण सोहळ्यात डॉ. पी. ए. इनामदार यांचे प्रतिपादन

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. गरिबीतून आलेल्या अनेकांनी आपले कर्तृत्वसिद्ध करून समाजाला दिशा दिली आहे. सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरीने मदत करणार असल्याचे प्रतिपादन एम. सी. ई. सोसायटी (पुणे) चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले.

तपोवन रोड, गुरुकुल कॅम्पस येथे एकता एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या डॉ. पी. ए. इनामदार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नामकरण सोहळा व नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. इनामदार बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, एससीईआरटीचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, अक्षय कर्डिले, एस. ए. इनामदार, संस्थेचे अध्यक्ष एन. ए. पठाण, शाळा समितीचे चेअरमन अनिल साळुंके, अलीम हुंडेकरी, अफजल कादर खान, नगरसेवक सुनील त्र्यंबके, विशाल सूर्यवंशी, गणेश गरड, देविदास डहाळे, समीर पठाण, प्राचार्य सुनील पंडित, प्राचार्य बाळकृष्ण कडूस, प्राचार्य शुभम टेमकर, मुख्याध्यापिका कुंदा झोंड, प्राचार्या मृगाक्षी घोष, मेजर शिवाजी पालवे, सलाम, इंजिनियर अन्वर शेख, इक्बाल शेख, रहीम खोकर, अ‍ॅड. फारुक शेख, मेजर शिवाजी गर्जे, संतोष चौरे, विठ्ठल लोखंडे, एजाज शेख, सिराज, सिंधुताई गरड, परवीन शेख, अर्चना पटवा आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, ज्ञान मंदिरातून परिवर्तनाची क्रांती घडणार आहे. यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. उभे राहिलेले हे संकुल सर्वसामान्यांचे जीवनमान व परिस्थिती बदलण्याची नांदी ठरणार आहे. सामान्य घटकातील नागरिकांची गरज ओळखून संस्थेने उभे केलेल्या शैक्षणिक संकुलाचे कौतूक केले. प्रास्ताविक शाळा समितीचे चेअरमन अनिल साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन सबा शेख व दिप्ती कराळे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका कुंदा झोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पा शिंदे, शितल कडूस, प्रियंका बोरुडे, अमोल निमसे, अभिजीत गवारे, फातिमा शेख, दानिश इनामदार, आसिफ पठाण, सलमान पठाण, परवेज शेख, साबेर पठाण, प्रियंका शिरसाठ, प्रियंका जयस्वाल, विमल पोतफुले, ज्योती मुर्तडकर, अशोक कुऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...