आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कोणताही धर्म समस्या नाही; पण आपण धर्माच्या नावाने शांतता आणली धोक्यात

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रत्येक देशाची भाषा, धर्म, प्रांत भलेही भिन्न असतील. मात्र सर्वांचा ईश्वर एकच आहे आणि आपण सर्व मानवजात त्याची लेकरे आहोत. कोणताही धर्म समस्या नाही, मात्र आपण धर्माच्या नावाने समस्या निर्माण करून विश्वबंधुता आणि जागतिक शांतता धोक्यात आणली आहे. आपण सर्वांनी मिळून सर्वांचा ईश्वर एकच आहे, भलेही त्याची नावे वेगळी असतील आणि आपण सर्व एकमेकांचे बंधूभगिनी आहोत, ही संकल्पना रुजवू शकलो आणि त्यातून समस्त मानवजातीचे कल्याण साधू शकलो, तरच या परिषदेचे फलित झाले, असे म्हणता येईल, असे प्रतिपादन बेलापूरचे भूमिपुत्र तथा अयोध्येतील राममंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.

इंडोनेशिया येथे बालीमध्ये आयोजित आर २० या जागतिक मुस्लिम परिषदेमध्ये ते भारताचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते. यावेळी शेख अब्दल्लह बिन अल महफोंढ बिन बेयह हेनरी नदुकूबा, थॉमस सचिरर्मचार आदींसह सर्व मुस्लिम देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आपणा सर्व धर्म गुरूकडून जगातील सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. आमचे वेद आणि ऋषी सांगतात की, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात देवाने लोक कल्याणासाठी संतांना व प्रेषितांना पाठवले. त्या सर्व भगवंताच्या प्रेषितांनी व संतांनी सर्वांना बंधुभाव शिकवला. परंतु वर्तमान कालावधीमध्ये धर्माच्या नावाखाली जागतिक अशांतता निर्माण करण्यात आली. अशा अशांतता निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्याही धर्म तत्वात नसाव्यात.

या सर्व निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ही परिषद ज्यांनी आयोजित केली ते अभिनंदनास पात्र आहे. त्यांच्या या छोट्या प्रयत्नामुळे अखिल मानवजातीच खूप मोठे कल्याण होईल. सर्व धर्मामध्ये अंशत: मतभेद असू शकतो. परंतु प्रत्येक धर्माने बंधुभाव सांगितलेलाच आहे. आपण या धरती मातेचे पुत्र आहोत. त्यामुळे आपण एकमेकांचे बंधुच आहोत. आजची सर्वात मोठी समस्या ज्याचा सामना आपण सर्व करत आहोत, ती समस्या म्हणजे भौतिकवाद. या भौतिकवादामुळे युवकांमधे सगळ्या धर्मानी दिलेली मानवता वादाची शिकवण आढळत नाही. भौतिक सुखच सर्वस्व असून ते प्राप्त करणेच जीवनाचे ध्येय बनले आहे, ही समस्या संपवण्याकरिता आपल्या सर्वांना एक चळवळ हाती घ्यावी लागेल. ती म्हणजे जगातील सर्व बालकांना नैतिक मुल्यांची शिकवण द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरांच्या विचारांचा डंका
स्वामींनी वेदांमधील व ज्ञानेश्वरीमधील संस्कृतमधून अनेक उदाहरणे देत भारतीयांनी पूर्वीपासून कसे जगाचे आणि मानव जातीच्या कल्ल्याणासाठी प्रयत्न केले व जगालाही शिकवण दिली हे पटवून दिले. सर्व जगात वैज्ञानिक प्रगती भरपूर झाली. पण धरणी माता संकटात आली, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...