आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:शहर सहकारी बँकेसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बुधवारपासून (२ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून बँकेचे १२ हजार ११० सभासद मतदार आहेत.

बँकेच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपली होती. परंतु कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता ११ डिसेंबरला मतदान होईल. २ नोव्हेंबर पासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल केले जातील. अंतिम मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...