आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Non cooperation From Maviya To The Education Policy Of The Centre; Allegation Of State Higher And Technical Education Minister Chandrakant Patil| Marathi News

भूमिपूजन:केंद्राच्या शैक्षणिक धोरणाला मविआ कडून असहकार; राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय धोरणावर आधारित कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. मात्र गेल्या अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने असहकार केल्याने शिक्षण क्षेत्रात काम होऊ शकले नाही. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर (बाबुर्डी घुमट) येथील उपकेंद्राने विद्यार्थ्यांना संशोधनावर आधारित शिक्षण द्यावे, असे आवाहन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन मंत्री पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते बाबुर्डी घुमट येथे झाले. त्यानंतर शहरातील न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयाच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात‍ ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रभारी कुलगुरु संजीव सोनवणे, अधिसभा सदस्य राजेंद्र विखे , कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉ.नंदकुमार सोमवंशी, बाबुर्डी घुमटच्या सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभाणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, विद्यापीठाने आपल्या कार्यपध्दतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे असे सांगून, भविष्यात उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठामध्ये रुपांत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी उपकेंद्रासाठी बाबुर्डी घुमट गावातील ८० एकर जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभाणे यांचा मंत्री पाटील आणि मंत्री विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्राध्यापकांच्या समस्या म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या समस्या नव्हे
आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापकांच्या समस्या म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या समस्या नव्हेत, असा टोला लगावला. दहा -दहा वर्ष कामे सुरू होत नाहीत, कंत्राटदारांच्या मानेवर बसून कामे करा अशी सूचना पाटील यांनी देतानाच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सर्वगुण संपन्न विद्यार्थी तयार होणार आहे, यासाठी उपकेंद्रांची आवश्यकता असून त्यामध्ये प्रामुख्याने कृषी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर आधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारच्या संशोधनारित शिक्षणामुळे भारताची विकासात्मक घौडदौड होत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेचा बाजार
महसूल मंत्री विखे म्हणाले, देशात जवळपास चाळीस वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आणि ते अंमलात आणले .हे दूरगामी परिणाम करणारे आहे. जगाच्या पाठीवर होणारे बदल स्विकारण्यासाठी विद्यापीठांनी आपली दारे उघडी केली आहेत. शिक्षण संस्थेची मान्यता घेऊन अनधिकृत पणे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे. हे चिंताजनक असून, ते राज्यकर्त्यांचेही अपयश असल्याचे सांगून याला अटकाव घालणे आवश्यक असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...