आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध भत्ते व सहाय्यक साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मदतनीसभत्ता, प्रवासभत्ता यासाठी प्रत्येकी ६ हजार रूपये भत्ता देण्याची तरतूद आहे.
परंतु, मंजूर निधी व त्या तुलनेत वाढलेले प्रस्ताव यामुळे जिल्हास्तरावर समान वाटपाचे धोरण घेतल्याने, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हाती साडेतीन ते चार हजारच दिले जात असल्याचे समोर आले आहे. समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी देऊन प्रोत्साहनासाठी अर्थसहाय्य दिले जाते.
२०२२-२०२३ शैक्षणिक वर्षात प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी सुमारे ६ कोटी ६९ लाख रूपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठवला होता. परंतु, प्रत्यक्ष ३.७९ कोटीच प्राप्त झाले. जिल्ह्यात पूर्व प्राथमिक ते माध्यमिक सुमारे ११ हजार ३२० दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा समावेशित शिक्षण प्रकल्पांतर्गत विविध सहाय्यक साहित्यासह ६ हजार प्रवास भत्ता, विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणाऱ्या पालक अथवा सहाय्यकास मदतनीस भत्ता ६ हजार रूपये देण्याची योजना आहे.
परंतु, शासनाकडून भत्यासाठी मंजूर प्रस्तावाच्या तुलनेत पाठवलेले प्रस्ताव जास्त असल्याने साडेतीन ते पावणेचार हजार विद्यार्थ्यांना मिळाले. त्यामुळे सरकारी योजनेतील लाभाचा आकडा व प्रत्यक्ष लाभ यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
65.72 लक्ष राहिले शिल्लक
६५.७२ लक्ष निधी गेला माघारी शासनाने समावेशित शिक्षण अंतर्गत फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील ११ हजार ३२० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहली, जनजागृती, शिबिरे, थेरपीसेवेसाठी उशिरा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे ६५ लाख ७२ हजारांचा निधी अखर्चित राहिला आहे. तर त्यामुळे हा निधी माघारी जाणार आहे. निधी उशिरा उपलब्ध होत असल्याने योजनेच्या मुळ उद्देशापर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.