आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. संत, महात्मा व महापुरुषांची जयंती दर्शन घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी असते. त्यांच्या विचारांमध्ये मानवजातीचे कल्याण आहे. हा विचार घेऊन चर्मकार विकास संघ सातत्याने समाजोपयोगी कार्य करीत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
चर्मकार विकास संघ, लोकनेते मा. आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रवीदास चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४६ वी जयंती विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. चर्मकार विकास संघाच्या नगर-मनमाड रोड, सावेडी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जयंती उत्सव सोहळ्यात जगताप यांच्या हस्ते सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी जगताप बोलत होते.
प्रारंभी संत गुरु रविदास महाराजांची आरती करुन महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या वेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सर्जेराव गायकवाड, नगरसेवक सुनील त्र्यंबके, डॉ. सागर बोरुडे, नीलेश बांगरे, कवी सुभाष सोनवणे, तायगा शिंदे, आदिनाथ बाचकर, महिला जिल्हाध्यक्षा रुक्मिणी नन्नवरे, रामदास सातपुते, प्रमोद भारुळे, रामदास उदमले, श्रीपती ठोसर, रामराव ज्योतिक, संपत नन्नवरे, गिरीश केदारे, विलास जतकर, अरविंद कांबळे, भाऊसाहेब आंबेडकर, दादासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, समाजाला दिशा देण्याच्या उद्देशाने जयंती दिनी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समाज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. चर्मकार संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख सदस्य असून, १२ हजार पदाधिकारी महाराष्ट्रात कार्यरत आहे. नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांच्या हस्ते चर्मकार विकास संघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत पुस्तके देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी केले. संतोष कानडे यांनी आभार मानले.
डॉ. आंबेडकरांनी साजरी केली पहिली जयंतीसंतांचे विचार जीवनाला दिशा देतात. संत रविदास महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांची पहिली जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साजरी केली होती. ज्ञान व विचारांचे बाळकडू भावी पिढीला देण्यासाठी संतांचे विचार वाचा, घरात संविधान ठेवा, कायदा अभ्यासा, लूट होणार नाही. ज्ञान नसल्यास लूट होत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.