आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी नेहमी नवीन शिकत राहिले पाहिजे. विद्यार्थी विनयशील, दणकट असावा, ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्यात रमणारा असावा. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचाराबरोबरच ध्येय समोर ठेवून आपल्या करिअरचे क्षेत्र निश्चित केल्यास अशक्य असे काहीच नाही, असे प्रतिपादन प्राचार्य बी.डी.बोर्डे यांनी केले.
नगर तालुक्यातील नारायण डोह येथील डॉ. ना. ज. पाउलबुधे तंत्रनिकेतन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पाडला. यावेळी सिव्हील विभाग प्रमुख रविंद्र शिंदे, मॅकेनिक विभागप्रमुख सय्यद अली, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख स्नेहल शिंदे, संगणक विभागप्रमुख स्वीटी वनवे आदि उपस्थित होते.
प्राचार्य बोर्डे म्हणाले, गेली दोन वर्षे कोविडमुळे शैक्षणिक क्षेत्रात सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. कोविडवर मात करुन आपण पुन्हा नव्या उत्साहात यावर्षी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, यासाठी विविध स्पर्धा घेऊन त्यामधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपली तुलना इतरांशी न करता स्वत:शी करावी. आई-वडिलांचे स्वप्न भंग करु नका. चिंता करण्याऐवजी चिंतन करावे. प्रत्येक घटनेतून नवीन शिकण्यासारखे असते. नवीन आत्मज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा, टेक्निकल इर्व्हेट, फनफेअर, फूड स्टॉल, रांगोळी, पोस्टर प्रेझेंटेशन, नृत्य अशा स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. प्रास्तविक तंत्रनिकेतनचे वरिष्ठ प्रा. विश्वनाथ आदवडे यांनी केले. कार्यक्रम यशस्विततेसाठी चंद्रकांत ढाकणे, केरुबा शेंडे, प्रतिक खेडकर, सौरभ पडोळे, रेखा रोटे, शशिकला देवकर आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार मनिषा गावडे हिने मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.