आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:राष्ट्रवादीच्या आंदोलनाची नगरपरिषदेकडून दखल

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्या जुन्या प्रभाग क्रमांक १२ व नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील अनेक भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या त्याकडे कोपरगाव नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणिक उपोषण केले होते. या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेने दखल घेवून जुन्या प्रभाग क्रमांक १२ व नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व विकासाच्या समस्या सोडविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुन्या प्रभाग क्रमांक १२ व नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील विकासाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेला लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात गोरोबा मंदिराच्या मागील स्मशान भूमीचे निधीची चौकशी करणे, अंबिका मेडिकल ते दत्तनगर जाधव वखार रस्ता, जाणेफळ गल्ली रस्ता, हनुमाननगर कब्रस्थान रस्ता, हनुमाननगर साईनाथ नेटारे घर रस्ता, दत्तनगर नारायण कुंढारे घर रस्ता, इंदिरानगर, दत्तनगर, गांधीनगर येथील पिण्याचे पाणी पाईपलाईन दुरुस्ती, दीपक घाटे घर ते तायरा आपा घर रस्ता, इंदिरानगरच्या संतोषीमाता मंदिर ते उत्तम चव्हाण घर रस्ता,अंगणवाडी दुरुस्ती, दत्तनगर व गोरोबानगरच्या शौचालयाची दुरुस्ती, दत्तनगर मधील डुकरे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे व आरोग्यविषयी समस्या सोडवण्याच्या मागण्या केल्या होत्या.

त्या उपोषणाची कोपरगाव नगरपरिषदेने दखल घेवून उपोषणकर्त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवेदनात देण्यात आलेल्या समस्या तातडीने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अजीज शेख यांनी दिली असून समस्या सुटल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने कोपरगाव नगरपरिषद कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...