आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 1.66 कोटी स्मार्ट वीजमीटर:आता ग्राहकांना मिळणार अचूक वीजबील; महावितरणची वितरण हानी होणार कमी

अहमदनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल 39 हजार 602 कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसवण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळणार असल्याने महावितरणची वितरण हानी कमी होऊन महसुलात वाढ होईल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

11 हजार 105 कोटींची तरतुद

राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल 39 हजार 602 कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरींग करण्यासाठी 11 हजार 105 कोटींची अंदाजित तरतुद करण्यात येणार आहे. यात सर्व वर्गवारीतील एकूण 1 कोटी 66 लाख ग्राहकांना तसेच 4 लाख 7 हजार वितरण रोहीत्र तर 27 हजार 826 वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे या योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे.

बळकटीकरणासाठी सुधारीत वितरण क्षेत्र योजना

राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे‚ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुधारीत वितरण क्षेत्र योजना राबवण्यात येणार आहे. यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग सोबतच वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणे, वितरण रोहित्रे आणि वाहिन्यांना संवाद-योग्य आणि अत्याधुनिक मीटरींग सुविधा प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे, असे सिंघल यांनी सांगितले.

वीजवाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन

या योजने अंतर्गत 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील 37 लाख 95 हजार 466 ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर बसवण्यात येतील. वाणिज्यिक व तांत्रिक हानी 15 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील 2 लाख 60 हजार 417 ग्राहक तर ग्रामीण भागातील 26 लाख 67 हजार 703 स्मार्ट मीटर बसवण्यात येतील. सर्व व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्चदाब वीजवापर असलेले 26 लाख 95 हजार 716 ग्राहकांकडे देखील हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. या विभागांमधील 25 केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची 2 लाख 30 हजार 820 वितरण रोहीत्रे आणि 27 हजार 826 वितरण वीजवाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर 2023 पर्यंत पुर्ण करावयाची आहे.

बातम्या आणखी आहेत...