आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडे:आता पुण्याला जाण्यासाठी 195 नव्हे 175 रुपये लागेल भाडे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. गर्दीचा हंगाम संपताच एसटीचे प्रवास भाडे पूर्वपदावर आले आहे. आता पुण्याला जाण्यासाठी १९५ नव्हे तर १७५ रुपये भाडे लागणार आहे. तर मुंबईचे भाडे देखील ४५० रुपयावरून कमी होत ४१० आकारले जाणार आहे. अहमदनगर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने दिवाळी हंगामात तात्पुरती भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाडेवाढ २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली होती.

प्रवाशांची या कालावधीत गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने जादा बस गाड्यांचे नियोजन केले होते. दिवाळीपूर्वी साध्या व जलद गाडीसाठी प्रति टप्पा भाडे ८ रुपये ७० पैसे होते, तात्पुरत्या दरवाढीमध्ये प्रति टप्पा भाडे ९ रुपये ७० पैसे प्रति टप्पा करण्यात आले. त्यामुळे अहमदनगर येथून पुणे येथे जाण्यासाठी साध्या गाडीला १९५ रुपये प्रवास भाडे तर मुंबईसाठी ४५०, कल्याण ३५० तसेच औरंगाबाद १८५१ रुपये भाडे आकारणी करण्यात आली. गर्दीच्या हंगामात एसटीने चांगली कामगिरी केली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे नगरमधून साध्या बसचे भाडे
पंढरपूर २९०, सोलापूर ३४०, नाशिक २५५, धुळे ३३०, पुणे १७५, मुंबई ४१०, औरंगाबाद १७५, कोल्हापूर ५१५, संगमनेर १५०, दादर ४००, शिर्डी १३०.

निमआराम प्रवास भाडे
पंढरपूर ३९०, सोलापूर ४६५, नाशिक ३४५, धुळे ४५०, पुणे २४०, मुंबई ५६०, औरंगाबाद २४०, कोल्हापूर ७००, संगमनेर २००, दादर ५४५, तर शिर्डी १८०.

बातम्या आणखी आहेत...