आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका, नर्सेस व अन्य कर्मचारी देखील सहभागी झाले होते. परिचारिका संपात सहभागी असताना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून स्वत: सेवा देत रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न केला. परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयातील परिचारिका तसेच अन्य तालुक्याच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या.
संपादरम्यान वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये सर्वसामान्य रुग्णांना रुग्णसेवा मिळावी या हेतूने जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ.श्रीकांत पाठक, डॉ. संदीप कोकरे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. सचिन सोलट, डॉ. नीलेश गायकवाड, डॉ. अरुण सोनवणे, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. संदीप बांगर, डॉ. मंगेश राऊत, डॉ. प्रशांत तुवर, अशोक कराळे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सेवा दिली. जिल्हा रुग्णालयात संपाच्या पार्श्वभूमीवर परिचारिका सेवेत नव्हत्या मात्र अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीची सेवा म्हणून केस पेपर व अन्य बाह्य रुग्ण कक्ष सुरूच ठेवले होते. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना उपचार व वैद्यकीय सेवा मिळाली. जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाला आमचा पाठिंबा आहे, मात्र आम्ही या संपात सहभागी होऊ शकत नाही. आज सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यांच्यावर नियमितपणे उपचार व औषधे देण्यात आली. त्यामुळे वैद्यकीय सेवा ठप्प झाली नाही, असे डॉ. मनोज घुगे यांनी सांगितले.
राज्य शासनाविराेधात लढण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांसोबत : संभाजी कदम
सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १४ मार्च पासून संप सुरू केला आहे. त्यांच्या या संपास ठाकरे गटाच्या शिवसेनेचा जाहीर पाठींबा दिला असल्याचे पत्र नगर शहर शिवसेना प्रमुख संभाजी कदम यांनी कर्मचारी संघटना यांच्याकडे दिले. कदम म्हणाले, राज्य शासनाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आपल्या बरोबर संपात सहभागी होऊन सहकार्य करू अशी पत्राद्वारे जाहीर करतो व आपल्या संपास पाठींबा जाहीर करतो. यावेळी शिवसेना नगरसवेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.