आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका:वारसा हक्काच्या यादीवर ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा आक्षेप ; याचिकाकर्त्यांची उपायुक्तांकडे मागणी

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २००० ते २००५ या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सेवेत सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीत अतिरिक्त तीन नावे महानगरपालिकेने परस्पर घुसवल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे. यात मोठे अर्थकारण झाल्याचा दावा करत ही यादी तात्काळ बदलावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी उपायुक्त श्रीनिवास कुरे यांची भेट घेऊन केली.

ज्या याचिकाकर्त्यांचे वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा आत आहे, अशांना सेवेत सामावून घ्यावे व ज्या कर्मचाऱ्यांचे वय ४५ पेक्षा अधिक आहे, त्यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई महापालिकेने द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात अपील करणार आहे.

दरम्यानच्या काळात संबंधित याचिकाकर्त्यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. महापालिकेने त्यांना यादी सादर करताना त्यात अतिरिक्त तीन नावे घुसवल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. यात अर्थकारण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संबंधित नावे असलेले व्यक्ती त्याकाळातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे वारस असून महापालिकेकडे आलेल्या अर्जानुसार सदर नावे समाविष्ट केल्याचे आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मात्र, महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या यादीमध्ये व याचिकाकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश नसल्याने सदर नावे यादीतून वगळावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. उपायुक्त कुरे यांनी न्यायालयात दावा केलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी करण्याचे आदेश साबळे यांना दिले. यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याचीही शिष्टमंडळाने मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...