आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:उड्डाणपुलावर अडथळा; ट्रक चालकावर गुन्हा

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उड्डालपुलावर ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित दिलीप मोरे (वय २५ रा. लिंबा गणेश, ता. जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अंमलदार श्रीकांत खताडे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

नागरिकांकडून उड्डाणपुलावर गर्दी केली जात आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, असे वाहने उभे करून फोटो काढले जात आहे. सोमवारी सकाळी ट्रक चालक मोरे याने उड्डाणपुलावरील रस्त्यावर ट्रक मध्यभागी उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता.पोलिसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...