आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाला 8 हजार 111 रुपये भाव जाहीर:दसऱ्याच्या मुहूर्तावर शेवगावात कापूस खरेदीला सुरुवात

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित शेवगाव संस्थेच्या वतीने विजयादशमीच्या मुहुर्तावर बुधवारी (ता. 5 कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी उच्च प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल 8111 रुपये भाव जाहीर करण्यात आला.

शेवगाव येथील मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या वतीने विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्धव महाराज सबलस व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. कापसाला आजचा भाव प्रतिक्विंटल 8 हजार 111 रुपये जाहीर करण्यात आला.

यावेळी काकासाहेब नरवडे, मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष अ‌ॅड. शिवाजी दसपुते, शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कोळगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास नेमाने, गंगाधर चोपडे, नाना मडके, बबेराव भालसिंग, राजेंद्र भराट, बप्पासाहेब पावशे, नाना मोटकर, रोहिदास कणसे, कापूस खरेदीदार शेख रहीम, कापूस विक्रेते शेतकरी सीताराम झाडे, पाराजी नजन, विलास लोखंडे, मच्छिंद्र महाराज पानकर, संभाजी काळे, अशोक वाघ, बन्सी पवार, राहुल सावंत व गोकुळ पठाडे व यांच्यासह मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासे, पाथर्डी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड शेवगाव तालुक्यात झाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेवगाव येथील मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.

सुरुवातीलाच कापसाला 8 हजार 111 रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, यावर्षी कापसाच्या भावात यापेक्षाही जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कपाशी पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीतून वाचलेल्या कपाशी पिकाकडून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...