आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यातील वेठबिगार बालकांवरील अत्याचार प्रकरण:घटना रोखण्यासाठी पथक स्थापन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयात विकल्याच्या घटनेनंतर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हा स्तरीय वेठबिगर समितीचे आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश देतानाच सामाजिक संस्थेच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी सोमवारी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एकमेव दोन हजार रुपये विकत घेऊन त्यांच्यावर अत्याचार करून मजुरी करून घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजत असून ,याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

वेठबिगार बालकांची त्यांच्याकडून सुटका देखील करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन सोमवारी ( 12 सप्टेंबर) ला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील वेठबिगार व बालकामगार यांच्यावर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी व भविष्यात त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत, यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळांकडे असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी या जिल्हास्तरीय बैठकीत दिले.

सामाजिक संस्थेच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी या बैठकीत दिली. कुठल्याही गावात किंवा शहरात बालकामगार वेठबिगार आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन डॉ.भोसले यांनी यावेळी केले. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व संगमनेर तालुक्यातील हे प्रकरण समोर आले असताना पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके तर संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात हे दोन्ही आमदार सत्ताधारी विरोधात असताना त्यांच्याकडून मात्र अद्यापही कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

घटनेनंतर पाच दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

दिव्य मराठीने वेठबिगारीचे हे प्रकरण उघडकीस आणले होते. 8 सप्टेंबरला दिव्य मराठीने चिमुकल्यांचा मेंढर बाजार असे वृत्त प्रकाशित केले होते. पाच हजार रुपयांच्या बदल्यात इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील मुलांच्या वेठबिगारीच हे प्रकरण होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. घटनेनंतर पाच दिवसांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...